कोल्हापूरातील बेपत्ता सख्या बहिणींचे मृतदेह आढळले विहिरीत; खून की आत्महत्या?

कोल्हापूरातील बेपत्ता सख्या बहिणींचे मृतदेह आढळले विहिरीत; खून की आत्महत्या?

कोल्हापूर । कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील जैनापूर इथं हनुमान नगरात राहणाऱ्या सख्या बहिणींचे मृतदेह विहिरीत आढळले. या दोघी बहिणी शनिवारी मध्यरात्रीपासून बेपत्ता होत्या. आज, सोमवारी हनुमान नगरापासून दानोळी रस्त्यावरील सुमारे अर्धा किमी अंतरावर असलेल्या यादव यांच्या शेतातील विहिरीत या दोघींचे मृतदेह आढळून आले. प्रियांका बाबासाहेब चौगुले आणि राजनंदिनी राजेंद्र उपाध्ये अशी दोघींची नावे आहेत. मृतातील एक बहिण विवाहित असून दुसरी अल्पवयीन आहे. त्यांच्या मृत्युचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रियंकाला दोन मुले असून राजनंदिनीचा साखरपुडा झाल्याचे समजते. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून विहिरीतील मृतदेह बाहेर काढले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज सिव्हील रूग्णालयात पाठविण्यात आले.AM News Developed by Kalavati Technologies