माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचे निधन; वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

भाजपाचे जेष्ठ नेते जसवंत सिंह यांचे निधन झाले असून, त्यांच्या जाण्याने भाजपला मोठा धक्का पोहोचला आहे

नवी दिल्ली । माजी केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे जेष्ठ नेते जसवंत सिंह यांचे निधन झाले. ते 82 वर्षाचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावण्याने ते कोमात होते. त्यांच्या निधनानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शोक व्यक्त केला. भाजपाच्या दिग्गज नेत्यांपैकी जसवंत सिंह यांची एक ओळख होती. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी एनडीएस सरकारमध्ये विविध खात्यांची जबाबदारी स्विकारली होती. 1996 ते 2004 दरम्यान, त्यांनी संरक्षण, परराष्ट्र, वित्त मंत्रालय अशा मोठ्या खात्यांचे मंत्रीपद भुषवले होते. आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत जसवंत सिंह यांना श्रद्धांजली वाहिली. जसवंत सिंह हे राजकारण आणि समाजकारणबाबतीत ते नेहमीच आठवणीत राहतील. असे ट्विट राजनाथ सिंह यांनी केले आहे.AM News Developed by Kalavati Technologies