'काश्मीरात हिंदू बहुसंख्य असते तर कलम 370 हटवले असते का? पी. चिदंबरम यांचा सवाल

माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली | मोदी सरकारने नुकतेच काश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम हटवण्याचा निर्णय घेतला. यानंतर विरोधकांकडून केंद्र सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. आता माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे. काश्मीरमध्ये हिंदू बहुसंख्य असते तर कलम 370 हटवलं असतं का? असा सवाल माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी विचारला आहे. तसेच जम्मू काश्मीर हे अस्थिर आणि अशांत आह. मात्र भारतीय मीडिया या घटनेकडे जाणीवपूर्वी दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही पी चिदंबरम यांनी केला आहे.

मात्री केंद्रीय मंत्री पी चिदंबरम हे कलम 370 हटवण्याच्या विरोधात आहेत. ते म्हणाले की, काश्मीरमध्ये सध्या अशांतता आहे. तिथली परिस्थिती निवळली आहे असे दाखवण्यात येतेय. मात्र हे वास्तव नाही. भारतातील मीडियाही काश्मीरमधील अशांत स्थिती दाखवत नाहीये. याचा अर्थ तिथे सर्व काही आलबेल आहे असे नाही. तसेच विरोधीपक्षामध्ये भाजपविषयी भीती आहे. यामुळे कलम 370 ला मोठ्या प्रमाणात विरोध झालेला नाही. तसेच बीजेडी, तृणमूल काँग्रेस, जद (यू), वायएसआर काँग्रेस, टीआरएस या पक्षांनी आम्हाला सहकार्य केले नाही कारण ते भाजपाला घाबरत आहेत असंही चिदंबरम म्हणाले आहेत.AM News Developed by Kalavati Technologies