पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला कोरोनाची लागण

आफ्रिदीने स्वत: सोशल मीडियावरुन आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती शेअर केली आहे.

नवी दिल्ली | पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. आफ्रिदीने स्वत: सोशल मीडियावरुन आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे. शाहिद आफ्रिदीने ट्विट करून असं म्हंटल आहे की "गुरुवारपासून माझी तब्येत खराब झाली होती, मला खूप थकवा जाणवत होता. त्यानंतर माझी कोरोनाची तपासणी झाली आणि दुर्देवाने माझा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. मला तुमच्या सर्वांच्या आशिर्वाद आणि प्रेमांची गरज आहे.

आफ्रिदीने गेल्या अनेक महिन्यांपासून पाकिस्तानमध्ये कोरोनामुळे संक्रमित आणि पीडित लोकांना मदत करण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहे. कोरोना संक्रमित लोकांसाठी त्याने अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला आहे. मात्र कोरोना संक्रमित रुग्णांची मदत करत असतांना आता शाहिद आफ्रिदीला कोरोनाची लागण झाली आहे.AM News Developed by Kalavati Technologies