पाच संशयित दहशतवादी घुसले, देशात आणि राज्यात हाय-अलर्ट जारी

उत्तर प्रदेशात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे

नवी दिल्ली । उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये पाच संशयित दहशतवादी दिसल्याने खळबळ उडाली आहे. सुरक्षा यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. देशात आणि राज्यात हाय-अलर्ट जारी करण्यात आला आहे. घातपाताची शक्यता लक्षात घेता उत्तर प्रदेशात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

दरम्यान, गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर सांगितले जात आहे की, काही संशयीत दहशतावादी आज दिल्लीत एकत्र येतील. त्यांच्याकडे एक वाहन देखील आहे. ही माहिती गुप्तचर यंत्रणांनी केलेल्या फोन टॅपिंगनंतर प्राप्त झाली असुन, यातील काही संशयीत काश्मीरहून दिल्लीत पोहचणार असल्याचेही सांगितले जात आहे. सुरक्षा यंत्रणांकडे या संशयीत दहशतवाद्यांचे रेखाचित्र देखील असल्याने, त्याच्या आधारावर त्यांची शोधमोहीम राबवली जात आहे.AM News Developed by Kalavati Technologies