'अगोदर आपल्या घरात दिवा त्यानंतर…' असे म्हणत ओवीसींची मोदींवर टीका

संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेवरून ओवीसींनी मोदींवर हल्लाबोल केला असून, त्यांनी ट्विट करत मोदींवर निशाणा साधला आहे

नवी दिल्ली । देशातील कोरोना व चीनच्या घुसखोरीसह अनेक मुद्यांवरून सातत्याने मोदी सरकारवर टीका करणारे एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी, पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत केलेल्या वक्तव्यांवरून ओवीसींनी मोदींवर निशाणा साधला आहे. 'तुमचे सरकार 80 हजार कोटी रुपयांचा बंदोबस्त करेल का?' पंतप्रधान कार्यालयास टॅग करत ओवीसींनी ट्विट करत असा प्रश्न विचारला आहे.

“सर तुमचे सरकार 80 हजार कोटी रुपयांचा बंदोबस्त करेल का? सर थाळी, टाळी, लाईट बंद, 21 दिन? 93 हजार 379 मृत्यू. अगोदर घरात दिवा त्यानंतर…” असे ट्विट करत, ओवेसींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. ओवेसींनी आपल्या ट्विटसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विट सुद्धा जोडले आहे. ज्यामध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत की, “जगातील सर्वात मोठ्या वॅक्सिन उत्पादक देशाच्या नात्याने आज मी जगभरातील समुदायास आणखी एक आश्वासन देऊ इच्छित आहे. भारताचे वॅक्सिन उत्पादन आणि वॅक्सिन पुरवण्याची क्षमता समस्त मानवजातीस या संकटातून बाहेर काढण्यासाठी कामी येईल.”AM News Developed by Kalavati Technologies