नागपूरातील महात्मा फुले भाजी बाजारात आग, आगीत 18 दुकाने जळून खाक

या आगीत जवळपास 18 दुकाने जाळून खाक झाली आहे.

नागपूर | नागपूरातील मध्यवर्ती भागातील सर्वात मोठा भाजी बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महात्मा फुले भाजी बाजारातील काही दुकानांना आज दुपारी आग लागली. या आगीत जवळपास 18 दुकाने जाळून खाक झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून हा बाजार 50 दिवस बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर गेल्याच आठवड्यात अटी व शर्तींसह हा बाजार खुला करण्यात आला. या बाजारातील एका दुकानास आज दुपारी सव्वा चार च्या सुमारास आग लागली, अग्निशमन दलाला सूचना देण्यात आली तोपर्यंत पाहता पाहता ही आग रांगेतील 18 दुकानांपर्यंत पोहचली होती. दरम्यान अग्निशमन दलाच्या 7 गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले असून सुदैवाने या आगीत कुठलीही जीव हानी झाली नाही. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही तरी विद्युत शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.AM News Developed by Kalavati Technologies