अखेर 'त्या' शेतकऱ्याला कर्जमाफीचे पत्र बँकेकडून मिळाले, उद्धव ठाकरे यांचे मानले आभार

अहमदपूर तालुक्यातील लिंगधाळ येथील शेतकरी सदाशिव फुलगुरले या शेतकऱ्याचे 49 हजाराचे लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज माफ झाले

लातूर । अहमदपूर तालुक्यातील लिंगधाळ येथील शेतकरी सदाशिव फुलगुरले या शेतकऱ्याचे 49 हजाराचे लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज माफ झाले. म्हणून 2017 मध्ये पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले होते. परंतु आजपर्यंत यांना कर्जमाफी मिळाली नव्हती. परवाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अहमदपूर तालुक्यात पिक परस्थिती पाहणी करण्यासाठी आले असता सदरील शेतकऱ्याने आपली व्यथा मांडली. याची दखल घेऊन उद्धव ठाकरे यांनी तात्काळ उपस्थित अधिकाऱ्यांना या गंभीर प्रकरणाची दखल घेण्याचे आदेश दिले. आज दिनांक 7 नोव्हेंबर रोजी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्यासमक्ष संबंधित शेतकरी सदाशिव फुलगुरले यांना बँकेच्या अहमदपुर शाखेत बोलावून फिल्ड ऑफिसर रामदास देशमुख यांनी कर्जमाफी दिल्याचे पत्र त्यांना दिले. यामुळे या शेतकऱ्याचा आनंद द्विगुणित झाला सदरील शेतकऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहे. असे असंख्य शेतकरी या कर्जमाफी पासून वंचित राहिले असून त्यांना तात्काळ बँकेने कर्जमाफी झाल्याचे पत्र द्यावे अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.AM News Developed by Kalavati Technologies