बदलापुरात वडिलांनी केली मुलीच्या प्रियकराची हत्या, मुलीचा छळ करत उचललं टोकाचं पाऊल

आरोपी पित्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ठाणे | वडिलांनी मुलीच्या प्रियकराची हत्या केल्याची घटना बदलापुरात घडली आहे. प्रियकर आपल्या मुलीचा छळ करत असल्यानं मुलीच्या वडिलांनी हे टोकाचं पाऊल उचललं.

सचिन शिंदे असं या हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून तो २६ वर्षांचा होता. त्याचे बदलापूरच्या कात्रप परिसरातील एका 35 वर्षीय घटस्फोटित महिलेशी प्रेमसंबंध होते. मात्र नंतर तो सदर महिलेला त्रास देऊ लागला. हे प्रकरण एकदा पोलीस ठाण्यातही जाऊन आलं, मात्र तरीही सचिनचा त्रास कमी झाला नाही. त्यामुळे या महिलेच्या वडिलांनी आज सकाळी सचिनला बदलापूरच्या कात्रप परिसरातील सुरवळ चौकात बोलावलं आणि चाकूने भोसकून त्याची हत्या केली. विशेष म्हणजे आरोपी पिता सचिनची हत्या केल्यानंतर चाकू कपड्यात गुंडाळून नातवाला सोडायला शाळेत गेला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. या घटनेने बदलापूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.AM News Developed by Kalavati Technologies