कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे - जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे

कर्जमुक्तीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण तातडीनं केले पाहिजे

औरंगाबाद | महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत ऑनलाइन पोर्टलवर पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध झाल्या असून योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे. तरी ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही त्यांचे आधार प्रमाणीकरण केलेले नाही, अशा शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचा विलंब न करता त्यांच्या नजीकच्या सीएससी सेंटर किंवा त्यांच्या संबंधित बँक शाखेत तत्काळ संपर्क करून त्यांचे आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे सदस्य सचिव डीएलसी तथा जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी कळविले आहे.

या योजनेतंर्गत ऑनलाइन पोर्टलवर पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध झाल्या असून त्यानुसार सीएससी सेंटर व बँकांकडे उपलब्ध सुविधेनुसार प्रसिद्ध झालेल्या यादीतील शेतकरी त्यांचे आधार प्रमाणीकरण करून घेऊन योजनेचा लाभ घेत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी प्रमाणीकरण केले नाही त्यांनी तातडीने ते करून घ्यावे म्हणजे प्रसिद्ध झालेल्या यादीतील सर्व शेतकऱ्यांना संबंधित बँकांमार्फत कर्जमुक्ती रकमांचा त्वरित लाभ देण्याची कार्यवाही करून सदर योजना पूर्ण केली जाईल.

तसेच पुढील विस्तारित कर्जमुक्ती योजना सुरू करण्यासाठी विलंब होणार नाही. सदर योजनेच्या मुख्य उद्देशानुसार योजनेस पात्र असलेले सर्वच शेतकरी सन 2020 - 21 या हंगांमामध्ये पिक कर्ज घेण्यासाठीही पात्र ठरणार आहेत. तरी पात्र शेतकऱ्यांनी तत्परतेने प्रमाणीकरण करावे , असे आवाहन जिल्हाधिकारी औरंगाबाद आणि जिल्हा उपनिबंधक , सहकारी संस्था, औरंगाबाद यांनी केले आहे.AM News Developed by Kalavati Technologies