शेतकरी, जवान नाही तर मोदी सरकारसाठी 3 ते 4 उद्योगपती देव; राहुल गांधींचा अर्थसंकल्पावरुन हल्लाबोल

"अर्थसंकल्पात सैंनिकांच्या पेन्शनमध्ये कपात करण्यात आली आहे ": खा. राहुल गांधी

दिल्ली । केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्पेवरुन काँग्रेस नेते व  खा. राहुल गांधी यांनी भाष्य करुन सरकारवर टीका केली आहे, अर्थसंकल्प हा शेतकरी आणि जवानांच्या फायद्याचा नसून केवळ उद्दोगपतींच्या फायद्याचा असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. सरकारचा अर्थसंकल्प हा सामान्य भारतीयांचा नसून केवळ एक टक्के लोकसंख्येसाठीचा अर्थसंकल्प असल्याची टीकाही काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे. तसेच त्यांनी सैनिकांच्या पेन्शन कपातीच्या मुद्यावरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. काही उद्दोगपतींचे हित डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पात सैंनिकांच्या पेन्शनमध्ये कपात करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

अर्थसंकल्पा वरुन राहुल गांधी यांनी ट्विट करत सरकारवर टिका केली ते म्हणाले की, "अर्थसंकल्पात सैंनिकांच्या पेन्शनमध्ये कपात करण्यात आली आहे. जवान आणि शेतकरी नाहीत तर मोदी सरकारसाठी केवळ तीन-चार उद्दोगपती देव आहेत." तसेच या आधी त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरुन सरकारवर निशाणा साधला होता. ते म्हणाले की, "मोदी सरकारने देश आणि घर या दोन्हींचे बजेट बिघडवले आहे.AM News Developed by Kalavati Technologies