हरभरा खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची आर्थिक लूट आ. रमेश आप्पा कराड यांच्याकडून पर्दाफाश

हरभरा खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याच्या तक्रारी येत होत्या

बीड | शासनाच्या आधारभूत हरभरा खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर शनिवारी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेश आप्पा कराड यांनी रेणापुर तालुक्यातील भोकरंबा येथे अँरोमा ऑरगॅनिक अॅग्रो प्रोडूसर या कंपनी समवेत खरेदी केंद्राला अचानक भेट दिली. यावेळी वजन काट्यातील फरक, शेतकऱ्यांना दिलेल्या बोगस पावत्या पावतीवर नसलेले मालाचे वजन, इच्छा नसतांनाही कंपनीचा शेअर्स घेण्याचे केलेले बंधन अशा अनेक घटना जिल्हाध्यक्ष रमेश आप्पा कराड यांच्या निदर्शनास आल्या. दरम्यान या गोष्टीची दखल घेत खरेदी केंद्रावर होत असलेली शेतकऱ्याची पिळवणूक आणि आर्थिक लूट थांबवण्यासाठी  रमेश आप्पा कराड यांच्या वतीने या सर्व गोष्टीचा पंचनामा करून जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. तसेच अशा प्रकारे शेतकऱ्याची फसवणुक करणाऱ्या कंपनीवर गुन्हे दाखल करुन संबधितांवर तातडीनं कारवाई अशी मागणी त्यांनी  जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यावेळी आ. रमेश आप्पा कराड यांच्यासमवेत भाजपा किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष साहेबराव मुळे, प्रदीप पाटील खंडापूरकर, रेणापुर पसचे सभापती रमेश सोनवणे,भाजपाचे रेणापूर तालुका अध्यक्ष दशरथ सरवदे, लातूर तालुका अध्यक्ष बन्सी भिसे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश आंबेकर, लक्ष्मण खंलग्रे श्रीकृष्ण पवार, विजय चव्हाण यांच्या अनेक जण उपस्थित होते.AM News Developed by Kalavati Technologies