शेतकरी संघटनेचे निर्बंधमुक्त शेतीसाठी धरणे आंदोलन

वर्धा, पुलंगाव, हिंगणघाट, समुद्रपूर येथील तहसील कार्यालयासमोर आंदोलन

वर्धा । शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत आज जिल्ह्याच्या वेगवेगळ्या तहसील कार्यालायसमोर शेतकरी संघटनेने निर्बंधमुक्त शेतीसाठी धरणे आंदोलन केले.

या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती, वीजबिल मुक्ती, तंत्रज्ञानाची स्वतंत्र बाजारपेठ, शेती व्यवसाय निर्बंध मुक्त करावा यासह वेगळ्या विदर्भाची मागणी करण्यात आली. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत वर्धा, पुलंगाव, हिंगणघाट, समुद्रपूर येथील तहसील कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी मोठ्या संख्येने शेतकरी व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.AM News Developed by Kalavati Technologies