मोदी सरकारच्या कृषी विधेयकावर शेतकरी आक्रमक; आज 'भारत बंद'ची हाक

केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर कृषी विधेयके मंजूर केली असून, या विधेयकाला शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे

नवी दिल्ली । संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राज्यसभेत बहुमताच्या जोरावर आवाजी मतदानाद्वारे मंजूर करण्यात आलेल्या कृषी विधेयकाला देशभरातून विरोध होत आहे. सरकारने राज्यसभेत कृषी विधेयके मंजूर केल्याने, शेतकऱ्यांसह अनेक विरोधकांनी तसेच सत्तेत असलेल्या अनेक खासदारांनी सुद्धा या विधेयकास विरोध केला. मात्र तरीसुद्धा राज्यसभेत कृषी विधेयके मंजूर करण्यात आली. त्यानंतर राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला होता. त्यामुळे उपसभापतींनी 8 खासदारांना निलंबीत केले. त्यानंतर देशात राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापले आहे. सरकारने बहुमताच्या जोरावर कृषी विधेयक मंजूर केली असली तरी, त्यातून शेतकरी हित साधले जाणार नाही. अशी भुमिका घेत अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने आज 'भारत बंद'ची हाक दिली आहे. या बंदमध्ये देशातील विविध संघटना, शेतकरी, अनेक राजकीय पक्ष एकत्रीत आले आहे.AM News Developed by Kalavati Technologies