प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे निधन, वयाच्या 72व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

40 वर्षांच्या कारकीर्दीत सरोज खान यांनी जवळपास दोन हजार गाणी कोरिओग्राफ केली.

मुंबई । बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गुरुवारी वयाच्या 72व्या वर्षी निधन झाले. त्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. या आजारपणात त्यांची कोरोना चाचणीही करण्यात आली होती. परंतु त्या निगेटिव्ह आढळल्या होत्या. आज मालाड येथील मालवणी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. सरोज यांच्या पश्चात पती बी. व्ही. सोहनलाल, मुलगा हमीद खान आणि हिना व सुकन्या या दोन मुली आहेत.

40 वर्षांच्या कारकीर्दीत सरोज खान यांनी जवळपास दोन हजार गाणी कोरिओग्राफ केली. त्यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. श्रीदेवी आणि माधुरी दीक्षित यांच्यासह बॉलिवूडच्या सर्व बड्या अभिनेत्रींनी त्यांच्या दिग्दर्शनाखाली नृत्य केले. याव्यतिरिक्त त्यांनी अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये कलाकारांना नृत्य शिकविले.AM News Developed by Kalavati Technologies