अवकाळी पावसामुळे श्रीवर्धनमधील शिस्ते गावातील भातशेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान

दिवाळी सणाच्या उंबरठ्यावर शेतकऱ्यांकडे उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसल्याने प्रशासन या शेतकऱ्यांना मदत करेल का? याकडे आता सर्वांच लक्ष लागलं आहे.

रायगड | संपूर्ण राज्यात कालपासून होणाऱ्या मुसळधार अवकाळी पावसामुळे कोकणात भातशेतीच मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. श्रीवर्धन तालुक्यात बहुतांशी लोकांचा उदरनिर्वाह मासेमारी व शेतीवर अवलंबून आहे. ढगांच्या कडकडाटासह झालेल्या तुफान पावसामुळे श्रीवर्धनमधील शिस्ते गावात भातशेतीच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरीवर्ग मोठ्या चिंतेत आहे.

शेतात पिकलेला भात त्याच ठिकाणी काही दिवस ठेवला जातो त्यामुळे शेतकऱ्यांना पावसाची कल्पना नव्हती त्यातच झालेल्या अवकाळी पावसाने भातशेतीमध्ये पाणी शिरले व भाताचे नुकसान झाले.
या गावातील शेतकरी पूर्णपणे शेतीवर उदरनिर्वाह करत असल्याने प्रशासनाकडून मदत मिळावी अशी आशा इथला शेतकरी व्यक्त करत आहे.

त्यातच अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणाच्या उंबरठ्यावर शेतकऱ्यांकडे उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसल्याने प्रशासन या शेतकऱ्यांना मदत करेल का? याकडे आता सर्वांच लक्ष लागलं आहे.AM News Developed by Kalavati Technologies