खळबळजनक! वडगाव कोल्हाटी येथे माजी उपसरपंचाच्या पुत्राची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

हत्येचे कारण अजुन अस्पष्ट, घटनेने वाळुज परिसरात खळबळ

वाळूज । वाळुज औद्योगिक क्षेत्रातील वडगाव कोल्हाटी येथे माजी उपसरपंच पुत्राची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. वडगाव कोल्हाटी येथील दिवंगत माजी उपसरपंच हौसाबाई पाटोळे यांचा मोठा मुलगा बाळू वामन पाटोळे (वय 35) याचा अज्ञात व्यक्तीने दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली व मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले.

या हत्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून जुन्या भांडणाच्या कारणावरून हत्या झाली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असुन दोन महिन्यात खुनाची ही दुसरी घटना आहे. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर सांवत, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत गम्भीरराव यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असुन हत्येमागचे कारण काय आहे याचा शोध पोलीस घेत आहे.AM News Developed by Kalavati Technologies