खळबळजनक! शेतीच्या वादातुन चुलत भावानेच केला; चुलत भावाचा खुन

कन्नड तालुक्यातील गराडा येथे शेतीच्या वादातून चुलत भावानेच चुलत भावाचा खुन केला असून, जोपर्यंत सुत्रधार गजाआड होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असे नातेवाईकांची मागणी आहे

कन्नड । शेतीच्या वादातुन झालेल्या भांडणात एका जणाचा खुन तर तीन जण जखमी झाले. ही घटना कन्नड तालुक्यातील गराडा येथे घडली आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असुन, आरोपीला ताब्यात घेण्यात आले पण सुत्रधार मोकाटच असल्याने मृतदेह घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला आहे. फिर्यादी मच्छिंद्र छगन चव्हाण हा त्याचा भाऊ सुरेश चव्हाण व किसन चव्हाण यांच्या समवेत स्वतंत्र तीन दुचाकीने शेतात घरच्यांना आणण्यासाठी जात होते. त्याचवेळी आरोपी राजु चव्हाण, अल्पवयीन रितेश चव्हाण (वय 17) ताईबाई उर्फ गीता व त्यांची मुलगी आरती (वय 21) हे शेतातुन घरी येत होते. तर फिर्यादीची पत्नी अनिता व भावजयी शोभा ह्यासुद्धा शेतातून घरी येत होत्या.

रस्त्यातच किसन चव्हाण व राजु चव्हाण यांच्यात वाद सुरु असतांना रितेशने कुऱ्हाडीने डोक्यात वार करून, किसन चव्हाण यास जखमी केले. तर भांडण सोडविण्यास आलेल्या सुरेश चव्हाण यांच्या डोक्यात राजु बाबु चव्हाण याने कुऱ्हाडीने वार करुन जखमी केल्याने तो बेशुद्ध पडला. फिर्यादी तसेच शोभा सुरेश चव्हाण हिलाही जखमी केले. बेशुध्दावस्थेत सुरेश चव्हाण त्यांना ग्रामीण रुग्णालयात नेले असता तेथे डॉक्टरांनी सुरेश चव्हणला मयत घोषित केले. अशी फिर्याद मच्छिंद्र चव्हाण याने दिल्यावरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.AM News Developed by Kalavati Technologies