खळबळजनक! उल्हासनगरात दुचाकी चोरीच्या संशयातून एकाची हत्या

उल्हासनगरात एका नेपाळी तरुणाने मोटारसायकल चोरी केल्याच्या आरोपावरून हत्या करण्यात आली आहे

कल्याण । चायनीजच्या दुकानात काम करणाऱ्या एका नेपाळी तरुणाने मोटारसायकल चोरी केल्याच्या संशयावरून 10 ते 12 जणांच्या टोळीने अपहरण करून हत्या केली व नंतर त्याचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला फेकून दिला. कल्याण जवळील चिंचपाडा परिसरात लक्ष्मीनगर येथील साईपुजा चायनीज सेंटर येथे भरत परिहार (वय 18) आणि राजु थापा हे दोघे मित्र काम करीत होते. भरत याने नेवाळी परिसरातून एक मोटारसायकल चोरली असल्याच्या संशयावरून 10 ते 12 अज्ञान इसम रविवारी रात्री चायनीज सेंटरजवळ आले. त्यांनी लाकडी दांडके व ठोशा-बुक्क्यांनी भरत परिहार व त्याच्या मित्राला बेदम मारहाण केली.आरोपींनी नंतर दोघांना जबरदस्तीने पांढऱ्या रंगाच्या मोटारगाडीतून बसवून नांदीवली गावाजवळ राजुला गाडीतुन उतरविले आणि भरतला घेऊन ते नेवाळीच्या दिशेने गेले.

पुढे भरतला आणखी मारहाण करून त्याची हत्या केली व त्याचे शव नेवाळी-मांगरुळ रस्त्याच्या कडेला फेकून दिले. हा परिसर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने घटनेचे सुरुवात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचपाडा येथे घडल्यामुळे हा गुन्हा विठ्ठलवाडी पोलीसांकडे वर्ग करण्यात आल्याने या प्रकरणी राजु थापा यांने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली असता, पोलिसांनी 10 ते 12 अज्ञात इसमांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे हे करीत आहेत.



AM News Developed by Kalavati Technologies

A PHP Error was encountered

Severity: Core Warning

Message: PHP Startup: Unable to load dynamic library 'ftp.so' (tried: /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so: cannot open shared object file: No such file or directory), /RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so (/RunCloud/Packages/php72rc/lib/php/extensions/no-debug-non-zts-20170718/ftp.so.so: cannot open shared object file: No such file or directory))

Filename: Unknown

Line Number: 0

Backtrace: