राम मंदिरासाठी प्रत्येक घरातून एक वीट आणि 11 रुपये द्यावेत, मुख्यमंत्र्यांचे अवाहन

500 वर्षापासून हा वाद सुरू होता.

लखनऊ | अयोध्येतील वाद आता मिटला आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानंतर राम मंदिर उभारण्यात येणार आहे. उत्तर प्रदेश राम मंदिर बांधण्यासाठी प्रयत्न करत आहे. नुकतेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिराच्या बांधकामासाठी लोकांकडे निधीसाठी आवाहन केले आहे. भव्य राम मंदिर उभारण्यासाठी प्रत्येक घरातून 11 रुपये आणि एक वीट द्यावी असे योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत. झारंखड येथील निवडणूक प्रचारसभेमध्ये ते बोलत होते.

योगी आदित्यनाथ बोलताना म्हणाले की, 500 वर्षापासून हा वाद सुरू होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांनी सोडवण्यात आला आहे. काँग्रेस, आरजेडी, सीपीआय-एमएल यांच्यासह अन्य पक्ष कित्येक वर्ष सुरु असलेला हा वाद मिटविण्याचा प्रयत्न करत नव्हते असा आरोपही त्यांनी यावेळी केला.AM News Developed by Kalavati Technologies