अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना घरी परतता येईन, मुंबईची लोकल बंद, शेवटी पोलिसच आले मदतीला

अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरी परतता येईन, मुंबईची लोकल, एसची बसेस बंद,

ठाणे | अत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आदेश सरकारने दिले आहे. मात्र त्यांनी त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहचायचे कसे असा प्रश्न या कर्मचाऱ्यांना आज भेडसावत आहे. यावेळी त्यांच्या मदतीला पोलीस धावल्याचे दिसून आले आहे. राज्यावर कोरोना व्हायरसचे संकट असतांनादेखील अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी आज स्वत:च्या व्हॅनमधून घरी सोडले. पोलिसांनी केलेल्या या सहकार्यामुळे कर्मचाऱ्यांना कामावरून आपल्या घरी परतता आले. मात्र आजचा दिवस तर निभावला. उद्या काय करायचे असा प्रश्न या कर्मचारी वर्गापुढे आहे.

टिटवाळा येथे राहणाऱ्या सरकारी कर्मचारी हे मुंबईतील रुग्णालयात कामाला आहेत. आरोग्य सेवा अत्यावश्यक सेवेत मोडते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहणे आवश्यक आहे. तसे आदेश सरकारी यंत्रणोकडून काढण्यात आले आहेत. कर्मचारी त्यांचे कर्तव्य बजावण्यासाठी तयार आहेत. त्यानुसार आज कर्मचारी कामावर निघाले. कल्याण येथून टिटवाळापर्यंत येण्यासाठी त्यांना बस व रेल्वेची व्यवस्था नसल्याने त्यांनी घर कसे गाठायचे असा प्रश्न होता. तेव्हा त्याना पोलिस व्हॅनचा आधार घ्यावा लागला. या सेवेतील कर्मचाऱ्यांना पोलिसांनी पोलीस व्हॅन मधून टिटवाळा येथे सोडले.

मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलचा उपयोग अत्यावश्यक कर्मचारी वर्गासाठी उपयुक्त असतो. मात्र रेल्वे व एसटी बसेस बंद करण्यात आल्यामुळे उद्या काय करायचे असा प्रश्न या कर्मचारी वर्गापुढे आहे.AM News Developed by Kalavati Technologies