भोकरदन तहसील कार्यालयातून अवैध वाळू उपसा करणारा जेसीबी नेला पळवून

भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भोकरदन । जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील राजूर परिसरातून आठ दिवसांपूर्वी भोकरदन पोलिसांनी वाळूमाफियांविरोधात केलेल्या कारवाईत अवैध वाळू उपसा करणारा एक जेसीबी जप्त केला होता. हा जेसीबी तहसील कार्यालयातून पळवल्याची घटना उघडकीस आला आहे. जप्त केलेला जेसीबी राजूर पोलीस ठाण्यात जमा होता. राजूर पोलिसांनी २५ रोजी भोकरदन तहसील कार्यालयात हा जेसीबी (एमएच २१ डीएफ ७८६२) जमा केला. मात्र, २६ च्या मध्यरात्री जेसीबीचा मालक नारायण कुंडलिक पवार याने तो जेसीबी तहसील कार्यालयाच्या आवारातून पळवून नेला. याप्रकरणी कोतवाल शेख इस्माईल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी करत आहेत.AM News Developed by Kalavati Technologies