क्रिकेट विश्वचषकावर इंग्लंडची मोहोर, अंतिम सामन्याचा सुपरओव्हरपर्यंत चालला थरार

दुसऱ्यांदा किवींचा फायनलमध्ये झाला पराभव.

स्पोर्टस डेस्क । लॉर्ड्स मैदानावर इंग्लंडने न्यूझीलंडला वर्ल्डकपच्या फायनलमध्ये धूळ चारली. इंग्लंडने पहिल्यांदाच विश्वचषकाला गवसणी घातली. वर्ल्डकप जिंकणारा इंग्लंड सहावा देश बनला आहे. याआधी वेस्टइंडीज, भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि श्रीलंकेने वर्ल्डकप जिंकलेला आहे. न्यूझीलंडची टीम सातत्याने दुसऱ्या फायनलमध्ये पराभूत झाली. गतवेळी त्यांना ऑस्ट्रेलियाने पराभूत केले होते. बेन स्टोक्स आणि जोस बटलरच्या शतकी भागीदारीच्या बळावर इंग्लंडचा संघ चॅम्पियन बनण्यात यशस्वी ठरला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत 50 षटकांत 8 गडी गमावून 241 धावा काढल्या. इंग्लंडचा संघही 50 षटकांत 241 धावाच काढू शकला. यामुळे विश्वचषकात पहिल्यांदाच अंतिम सामन्याचा निर्णय सुपरओव्हरने झाला.

असा होता सुपरओव्हरचा थरार

इंग्लंडने सुपरओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करत 15 धावा काढल्या. यासाठी बटलर आणि स्टोक्सने फलंदाजी केली. न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टने गोलंदाजी केली. न्यूझीलंडसाठी मार्टिन गुप्तिल आणि जेम्स नीशमने फलंदाजी केली. दोघांनीही 15 धावा काढल्या. इंग्लंडसाठी जोफ्रा आर्चरने गोलंदाजी केली. सुपरओव्हरमध्येही दोन्ही संघांच्या धावा समसमान झाल्या. परंतु सुपरओव्हरमध्ये सर्वात जास्त चौकार लगावण्याच्या आधारावर इंग्लंड जगज्जेता बनला.

>> तत्पूर्वी स्टोक्स आणि जोस बटलरने पाचव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. स्टोक्सने नाबाद 84 धावा काढल्या. बटलर 59 धावा करून बाद झाला. जॉनी बेयरस्टो 36 धावा करून फर्ग्युसनच्या चेंडूवर बाद झाला. कर्णधार इयॉन मॉर्गन 9 धावा करून तंबूत परतला. जेम्स नीशमच्या चेंडूवर लॉकी फर्ग्युसनने त्यांचा झेल टिपला. जेसन रॉय 17 धावा करून बाद झाला. त्याला मॅट हेन्रीने टॉम लाथमकरवी झेलबाद केले. जो रूट 7 धावा करून ग्रँडहोमच्या चेंडूवर बाद झाला. यापूर्वी ग्रँडहोमनेच 11व्या ओव्हरमध्ये जो रूटचा झेल सोडला होता. तेव्हा रूट केवळ 2 धावांवर खेळत होता. तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून किवींनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने इंग्लंडसमोर विजयासाठी 242 धावांचा डोंगर उभा केला आहे. न्यूझीलंडकडून सलामीवीर हेन्री निकोल्सने अर्धशतकी खेळी साकारली आहे. तर टॉम लॅथमने 42 धावांचे योगदान दिले. कर्णधार केन विल्यसनने 30 धावा केल्या.

इंग्लंडचा संघ
इयॉन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेयरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (यष्टिरक्षक), मोइन अली, क्रिस वोक्स, लियम प्लंकेट, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, टॉम करन, मार्क वुड, जेम्स विन्स, लियम डॉसन.

न्यूझीलंडचा संघ
केन विलियम्सन (कर्णधार), रॉस टेलर, टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, कॉलिन डी ग्रँडहोम, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गुप्टिल, मॅट हेनरी, टॉम लाथम, कॉलिन मुन्रो, जेम्स नीशम, हेन्री निकोलस, मिशेल सँटनर, ईश सोढी, टिम साउदी.AM News Developed by Kalavati Technologies