जीप पुलावरून नदी पात्रात कोसळली, चार जण जखमी

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

जिंतूर । जिंतूर शहरापासून अडीच कि.मी. अंतरावर जिंतूर-देवगाव फाटा या राज्य महामार्गावरील पुलावरून मंगळवार 26 नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान खाजगी जीप पुलावरून नदीपात्रात कोसळल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जिंतूर- देवगाव फाटा या राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून महामार्गावरील महत्त्वाच्या ठिकाणच्या दोन पुलांना कुठल्याही प्रकारचे कठडे किंवा रात्रीच्या वेळी चमकणारे रेडीएटर्स सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्यापही बसविलेले नसल्याने या महामार्गावर मोठ्या अपघातांची मालिका सुरूच राहत आहे.  

मंगळवार 26 जुलै रोजी नांदेड जिल्ह्यातील भागीरथाबाई दत्‍तराव जाधव (वय 68 वर्षे) यांना वैद्यकीय उपचारासाठी त्यांचे कुटुंबीय औरंगाबाद येथे नेत असताना गाडी चालकाला पुलावरील रस्त्याच्या बाजुचा अंदाज न आल्याने त्या पुलावरून नदी पात्रात कोसळली यामध्ये वनिता शिवाजी गिरामकर (वय 40 वर्षे) दत्तराव लक्ष्‍मण जाधव (वय 70 वर्षे) कृष्णा शिवाजी गिरामकर (वय 25 वर्षे) सर्व राहणार हादगाव जिल्हा नांदेड या अपघातात जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचारासाठी जिंतूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु जखमींना जास्त प्रमाणात जखम असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी परभणी येथे हलविण्यात आले आहे.

[मागील दोन महिन्यापूर्वी याच पुलावरून जिंतूर- पुणे जाणारी ट्रॅव्हल्स 50 प्रवाशांसह पुलावरून नदीपात्रात कोसळली होती. यावेळीही कुठल्याही प्रकारची जीवित हानी या अपघातात झाली नसली तरीही अपघात हा भयावह होता असे असतानाही यानंतरही ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुरक्षा योजना आखण्यात आलेली नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हे नेहमीच या राज्य महामार्ग साठी निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत असताना एकीकडे दरवर्षी जिंतूर -देवगाव फाटा या राज्य महामार्गावर डागडुजीच्या नावाखाली कोट्यावधी रुपये खर्च करण्यात येतो या सर्व प्रकाराकडे प्रशासनाने योग्य वेळी लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा यापेक्षाही मोठे अपघातांना नागरिकांना सामोरे जावे लागणार आहे.]AM News Developed by Kalavati Technologies