महाबळेश्वर पंचायत समिती मार्फत शिक्षण महोत्सवाचे आयोजन

महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम भागातून तब्बल 181 शाळेतील शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग

सातारा | महाबळेश्वर पंचायत समिती मार्फत शिक्षण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचा शुभारंभ पंचायत समिती कार्यालयातून शुभारंभ करण्यात आला. बाजार पेठेतून ग्रंथ दिंडी काढण्यात आली. शिक्षण महोत्सवाचे उद्घाटन बाळासाहेब भिलारे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. महाबळेश्वर पंचायत समिती सभापती अंजनाताई कदम उपसभापती संजूबाबा गायकवाड व इतर सदस्य उपस्थित होते. महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम भागातून तब्बल 181 शाळेतील शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. मुलांनी यावेळी विविध कला सादर केल्या. सदर शिक्षण महोत्सव 2 दिवस चालणार असून अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा शिक्षण महोत्सव 2 दिवस चालणार आहे. शिक्षकांना प्रोत्साहित करण्यासाठी व त्यांना हक्काचं व्यासपीठ मिळवून देण्याचा हा प्रयत्न आहे. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी व पालकांना देखील या ठिकाणी समाविष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यासाठी बालसाहित्य संमेलन, शिक्षकांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाबळेश्वर तालुक्यातून तब्बल 181 शाळांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. उद्या शिक्षकांसाठी प्रबोधन करण्यासाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शेवटच्या सत्रात पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडणार असून कार्यक्रमाची सांगता होणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies