देशभरात आज दसऱ्याचा उत्साह; राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून देशवासियांना शुभेच्छा

दसऱ्याच्या पार्श्वभुमीवर अनेक दिग्गजांनी देशावासियांना शुभेच्छा दिल्या आहेत

मुंबई । आज विजयादशमी असून देशभरात आज दसरा साजरा केला जात आहे. त्यापार्श्वभुमीवर अनेक मान्यवरांनी देशवासियांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून, अगदी साध्या पद्धतीने दसरा हा सण साजरा केला जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दसऱ्याचा शुभेच्छा दिल्या. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, 'वाईटावर चांगल्याचा विजय आणि असत्यावर सत्याच्या विजयाचे हे महापर्व प्रत्येकाच्या जीवनात एक नवी प्रेरणा घेऊन येईल' असे मोदी यांनी त्यांच्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.AM News Developed by Kalavati Technologies