अवैध रित्या दारू विक्रीवर धाड, किचन मार्गे बंद बारमधून विकत होता दारू

बारला सील ठोकत पुढील कार्यवाही सुरु

भंडारा | कोरोना वायरसचा प्रकोप बघता सरकार ने देशात संचारबंदीचे आदेश लागू केले. अस असताना भंडारा शहर लगतच्या राष्ट्रीय महामार्गावर स्थित एक बार संचालका द्वारे सर्रास दारू विक्री केली जात होती. कंबोज नामक या बार च्या किचनच्या मार्गातून दारु विक्री सुरु असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने या बार वर धाड घालीत बार मालका सह तीन लोकांविरुध्ध गुन्हे दाखल केले. अवैध रित्या विक्री केली जात असलेली दारू जप्त केली. सोबतच दारू बंदी विभागालासुध्दा याची माहिती देत बार ला सील करण्यात आले. ही कार्यवाही सोमवार रात्री ९ वाजताच्या दरम्यान करण्यात आली.

कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी संचारबंदी सोबतच शासनाने राज्यातील सर्व देशी, विदेशी दारु दुकाने बंद केली असताना भंडारा शहरा लगतच्या राष्ट्रीय महामार्गावर स्थित कम्बोज बारमधून अवैधरित्या विदेशी दारुची विक्री केली जात होती. बार मालक द्वारे नोकरांच्या मदतीने चक्क बार च्या मागील दारातून दारू विक्री सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक कंकाळे यांना मिळाली. माहितीच्या आधारावर त्यांच्या पथकाने या बार वर धड घातली. यात ६४ हजार ४८० रुपयांचा अवैध मद्यसाठा आढळला. राष्ट्रीय महामार्गावरील कम्बोज बारचा गेट उघडा असून दाराजवळ काही इसम दुचाकीच्या डिक्कीत अवैधरित्या विदेशी दारुची विक्री करताना आढळले. तसेच किचनच्या खिडकीतून बार मध्ये प्रवेश करीत फ्रिजमध्ये विदेशी दारु लपविलेली असून बाजारभावापेक्षा अधिक दराने दारुची विक्री करीत असल्यचेही पोलिसांना आढळून आले. याची माहिती पोलिसांनी उत्पादन शुल्क विभागाला दिल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाला दिली. संजू कम्बोज, नोकर प्रविण शुक्ला व काशिराम दुपारे यांना ताब्यात घेत संचार बंदी कायदा व दारू बंदी कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल केले आहे. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून ६४ हजार ४८० रुपयांचा मद्यसाठा आढळून आला. तसेच सदर मद्यसाठा हा बारमधीलच असल्याचे निष्पन्न झाल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने बारला सील ठोकत पुढील कार्यवाही सुरु केली आहे.AM News Developed by Kalavati Technologies