Drug Case : दीपिका नंतर अभिनेत्री श्रद्धा कपूर चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात हजर

दीपिका पादुकोण नंतर अभिनेत्री श्रद्धा कपूर एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाली आहे

मुंबई । बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर चौकशीसाठी आज एनसीबी कार्यालयात दाखल झाली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या चौकशीमध्ये बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण समोर आले. त्यामध्ये दीपिका, सारा, श्रद्धा आणि रकुल प्रीत सिंह याचे नाव समोर आलं आहे. त्यामुळे आज ड्रग्स प्रकरणी एनसीबी दीपिका नंतर आता श्रद्धा कपूरची सुद्धा चौकशी करणार आहे. एनसीबीने बुधवारी अभिनेत्री दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह यांना समन्स बजावून चौकशीस हजर राहण्याची सूचना केली होती. त्यानुसार, आज सकाळी दीपिका पादुकोण चौकशीसाठी हजर झाली आहे. त्यानंतर आता श्रद्धा कपूर सुद्धा एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाली आहे. शुक्रवारी रकुल प्रीत सिंह आणि दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांचीसुद्धा चौकशी करण्यात आली. त्यादरम्यान, रकुल प्रीत सिंहने ड्रग्सच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपची अ‍ॅडमिन दीपिकाच होती असे सांगितले आहे. त्यामुळे आता दीपिकाची कसून चौकशी केली जाणार आहे.



AM News Developed by Kalavati Technologies