दौंड । जाळी लावली रानडुक्करांसाठी, सापडला बिबट्या अन्...

दौंडच्या पारगाव येथील घटना, रेस्क्यू टीमने बिबट्याला केले जेरबंद

दौंड । शेतातील पिकाचे नुकसान करणारी रानडुक्कर पकडण्यासाठी लावलेल्या जाळीत चक्क बिबट्या जेरबंद झाला. दौंड तालुक्यात भिमा नदीच्या काठावरील परिसरात गेले अनेक दिवसांपासून बिबट्यांचा वावर आहे. पारगाव शिवारात गेल्या सहा महिन्यांत तीन बिबटे पकडण्यात वनविभागाला जरी यश आले असले तरी. चौथा बिबट्या आयताच पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. पिंजरा लाऊन सुद्धा बिबट्या पकडणे अवघड असताना आता मात्र रानडुक्कर पकडण्यासाठी लावलेल्या जाळीत बिबट्या अलगत सापडल्याने वनविभागाला आयत्या बिळात नागोबा. या म्हणी प्रमाणे बिबट्या जेरबंद करण्यात यश आले.

पारगाव येथील शेतकरी सुनील शेळके व त्यांचा मुलगा यांना त्यांच्या गव्हाच्या शेताच्या बांधावर रानडुक्कर पकडण्यासाठी लावलेल्या जाळीत चक्क बिबट्या अडकलेला दिसतास या पिता-पुत्राला सकाळी सकाळी बिबट्याला पाहून घाम फुटला. ही माहिती तात्काळ दौंड येथील वनविभागाला कळवली. यानंतर वनविभागाने बिबट्या असल्याचे खातरजमा करून पुणे येथील रेस्क्यु आँपरेशन करणा-या टीमला पाचारण केले. यानंतर बिबट्याला बेशुद्ध करून त्याची अडकलेल्या जाळीतून सुटका करत उपचार करण्यासाठी रवाना करण्यात आले.AM News Developed by Kalavati Technologies