राज ठाकरेंच्या नादाला लागू नका; इम्तियाज जलील यांना इशारा

आत्ताच सांगू ठेवतो असं म्हणत बाळा नांदगावकर यांनी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांना इशारा दिला आहे

मुंबई । अधिवेशनात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आमच्या आरत्यांचा त्रास लोकांना होत नाही मग नमाजचा त्रास लोकांना का? असा सवाल उपस्थित केला होता. राज ठाकरेंच्या या विधानावरुन एमआयएम नेते इम्तियाज जलील यांनी गेले अनेक वर्ष राज ठाकरे राजकारणात होते. मात्र त्यांच्या कानाला आताच त्रास कसा काय होतो आहे असा सवाल उपस्थित करत राज ठाकरेंवर टीका केली होती. यावर आता राज ठाकरे यांच्या नादाला लागायचं नाही, आत्ताच सांगू ठेवतो असं म्हणत बाळा नांदगावकर यांनी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांना इशारा दिला आहे.AM News Developed by Kalavati Technologies