अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जेवणार सोन्याच्या ताटात

35 जणांच्या टीमने तीन आठवडयांमध्ये सोन्या-चांदीची ही क्रॉकरी बनवली

नवी दिल्ली | अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी तयारी मोठ्या धडाक्यात सुरू आहे. ट्रम्प कुठे उतरणार, कुठे राहणार या सर्व गोष्टी ठरलेल्या आहेत. ट्रम्प यांच्या प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे या दौऱ्यामध्ये ट्रम्प यांच्या कुटुंबियांना भारतीय पद्धतीचे जेवण सोने आणि चांदीच्या ताटात दिले जाणार असल्याची माहिती आहे. यासाठी स्पेशल तयारी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. जयपूरच्या अरुण पाबुवाल यांनी ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबासाठी खास सोन्या-चांदीची मुलामा दिलेली क्रॉकरी तयार केली आहे.

डिझाइन केलेल्या या खास गोल्ड प्लेटेड क्रॉकरीमध्ये ट्रम्प आणि त्यांचे कुटुंब ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर करणार असल्याची माहिती पाबुवाल यांनी दिली. या क्रॉकरीमध्ये कपसेटपासून ड्रायफ्रूट ठेवण्याची कटलरी सुद्धा ठेवण्यात आली आहे. सोन्याचा मुलामा दिलेला खास नॅपकिन सेटही बनवण्यात आला आहे. त्यावर ट्रम्प यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत. 35 जणांच्या टीमने तीन आठवडयांमध्ये सोन्या-चांदीची ही क्रॉकरी बनवली. वेगवेगळया धातूंचा समावेश केलेल्या या थाळयांना सोन्या-चांदीचा मुलामा देण्यात आला आहे.AM News Developed by Kalavati Technologies