भारत आणि अमेरिकेदरम्यान 3 अब्ज डॉलर्सचा संरक्षण करार

ट्रम्प यांची दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा

नवी दिल्ली | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. अहमदाबादमधील भव्य स्वागतानंतर आजचा दिवस धोरणात्मक निर्णय घेण्याचा आहे. आज ट्रम्प दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. यामध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. भारत आणि अमेरिकेदरम्यान 3 अब्ज डॉलर्सचा संरक्षण करार करण्यात आला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांना घोषणा केली की, भारत-अमेरिकेमध्ये 3 बिलियन डॉलरचा संरक्षण करार होणार आहे. यासोबतच भारत आणि अमेरिकेमधील ट्रेड डीलचा पुढील विचार करण्यात येईल. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना राजघाट येथे श्रद्धांजली वाहून केली.AM News Developed by Kalavati Technologies