तलाक! तलाक! तलाक! बोलत युवकाने पत्नीसहीत दोन मुलांना सोडून केला दुसरा निकाह

आरोपीस कठोर शिक्षा व्हावी, राष्ट्रवादीचे म्हसळा शहर अध्यक्ष रियाज घराडे यांची मागणी

रायगड । जिल्ह्यातील म्हसळा शहरात तोंडी तलाक! तलाक! तलाक! बोलून युवकाने पत्नीसहीत दोन मुलांना सोडून दिले आहे. जिल्हयात पहिल्यांदाच ट्रिपल तलाकाची प्रथा समोर आली असून पिडीत तरूणीने सकाळी 11 वाजता म्हसळा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

देशात तोंडी ट्रिपल तलाकाचे प्रमाण वाढत असल्यांने यावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने नुकतेच देशात ट्रिपल तलाक विरोधी कायदा तयार केला आहे. कायद्यानंतर शहरातील ही प्रथमच तक्रार म्हसळ्यामध्ये समोर आली असुन शहरातील एका युवकाने शरीफा मोहम्मद हनिफ शेख या तरुनीशी निकाह केला होता. साजीद इनामदार असे त्याचे नाव असून तो दुबईतील व्यवसायीक आहे. म्हसळा शहरात व्यवसायासाठी ये जा करत असल्याने त्याचे इतर तरुणीशी प्रेमसबंध जुळले. या तरुणी सोबत लग्न करण्यासाठी इनामदार याने 31 ऑक्टोंबर 2019 रोजी आपल्या पहिल्या पत्नीला तोंडी तलाक ! तलाक ! तलाक ! बोलून सोडून दिले. यानंतर महिलेने पोलिसांत धाव घेतली. या दामपत्यास दोन मुले असून साजीद इनामदार ( वय 5 वर्षे ) व मुसा साजीद इनामदार (वय 4 वर्षे ) अशी त्यांची नावे आहेत. इनामदार आपला दुसरा विवाह रविवारी सकाळी 11: 30 वाजता करणार होता असी माहिती महिलेने पोलिसांना दिली आहे. राष्ट्रवादीचे म्हसळा शहर अध्यक्ष रियाज घराडे यांनी शरीफा साजीद इनामदार हिच्या सोबत त्याचे पहिले लग्न झाले होते त्याचा त्याला विसर झाला आहे. एका मुलीचे आयुष्य वेशीवर टांगणाऱ्या आरोपी इनामदार याला कठोर शिक्षा व्हावी अशी त्यांनी मागणी केली आहे.AM News Developed by Kalavati Technologies