शिरपूर सहकारी साखर कारखान्यावर जिल्हा बँकेची जप्ती

शिरपूर साखर कारखान्याची बाजारभावानुसार 300 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. 2010 पासून हा कारखाना बंद आहे

धुळे । 72 कोटी रुपयांच्या थकीत कर्जापोटी धुळे जिल्ह्यातील शिरपूर सहकारी साखर कारखान्यावर आज धुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जप्तीची कारवाई केली. दुसऱ्यांदा ही कारवाई करण्यात आली आहे.

यापूर्वी 2012 मध्ये जिल्हा बँकेने हा साखर कारखाना जप्त केला होता. मात्र ती कारवाई बेकायदेशीर ठरवून न्यायालयाने कारखान्याचा ताबा पुन्हा संचालक मंडळाकडे देण्यास भाग पाडले होते. मार्च महिन्यात ताबा हस्तांतरित करण्यात आला. मात्र त्यानंतर 10 महिने उलटूनही कर्जफेडीची कोणतीच हालचाल न केल्यामुळे आज पुन्हा बँकेने कारखाण्याचा प्रतिकात्मक ताबा घेतला. या कारवाईला विद्यमान संचालक मंडळाने लेखी स्वरूपात विरोध दर्शवून ताबा न सोडण्याची भूमिका घेतली. मात्र आपली कारवाई पूर्ण झाली असून कारखाण्याबाबतचे आगामी निर्णय लवकरच घेऊ असे बँकेचे सीईओ धीरज चौधरी यांनी जाहीर केले. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गालगत शिरपूर साखर कारखान्याची बाजारभावानुसार 300 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. 2010 पासून हा कारखाना बंद आहे. सध्या या कारखान्यावर माजी शिक्षणमंत्री अमरिषभाई पटेल यांच्या गटाचे संचालक मंडळ आहे.AM News Developed by Kalavati Technologies