इचलकरंजी पाणी योजनेला विरोध ; बिद्री पुलावर 4 तास रस्ता रोको

ऐन पावसाळ्यात पाण्यावरून वाद पेटला, कोल्हापूरात शेतकरी आक्रमक


कोल्हापूर । दुधगंगा नदीतून इचलकरंजीला पाणी देण्यास आता विरोध वाढत चालला आहे. कागल तालुक्यातील बिद्री याठिकाणी नदीकाठावरील नागरिकांचा सुमारे दोन तास रास्ता रोखो आंदोलन केला आहे. इचलकरंजीला पाणी देण्यावरून नवा वाद निर्माण झाला असून या आंदोलनात कागल, राधानगरी, करवीर आणि भुदरगड तालुक्यातील शेतकरी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झालेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांचाही आंदोलनात सहभाग नोंदवला होता.

इचलकरंजीला पाणी देण्यावरून आता मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. गेल्या 15 दिवसांपासून सहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन करायला सुरुवात केली आहे. इचलकरंजी शहराच्या 'पाणी उशाला तर मग दुधगंगा नदीतून पाणी कशाला' असा प्रश्न जिल्ह्यातील सहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे. कागल तालुक्याच्या सुळकूड पाणी योजनेतून इचलकरंजी शहराला पाणी देण्याचा प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू झाला. पण याला कागल, करवीर, राधानगरी, भुदरगड, शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातून विरोध केला गेला.

संघर्ष करून आम्ही पाणी मिळवलंय तर मग आमच्या वाट्याचे पाणी इचलकरंजी शहराला का द्यायचं असा सवाल होत आहे. पंचगंगा नदी इचलकरंजी शहराच्या जवळ आहे. असे असताना सुळकूडमधून पाणी का घेण्यापेक्षा पंचगंगा नदीतून पाणी का घेत नाही असे विचारले जात आहे. आम्ही तर पाणी देणारच नाही असे म्हणत त्यामुळे भविष्यात प्रसंगी हायवे रोको करू, पाटबंधारे अधिकाऱ्यांच्या घरासमोर आंदोलन करू मात्र इचलकरंजीला पाणी देणार नाही असा इशारा देण्यात आला.

न्याय मागणीसाठी आंदोलनकर्त्यांनी कार्यकर्त्यांचा सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडाला असून एकीकडे जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार सुरू असताना देखील आंदोलकांना सोशल डिस्टनसिंगच भान मात्र राहीले नाही.AM News Developed by Kalavati Technologies