नांदेडमधील मुदखेड नगरपालिका बरखास्त करा, भाजपचे प्रविण गायकवाड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुदखेड नगरपालिका पुर्णपणे अपयशी ठरली असल्याचा आरोप प्रविण गायकवाड यांनी सत्ताधारी काँग्रेसवर केला आहे.

नांदेड | मुदखेड शहरात मागील काही दिवसांपासून दुषित पाणी पुरवठा करण्यात येत असून यामुळे मुदखेड शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुदखेड शहर नगरपालिकेच्या या दुषित पाणी पुरवठ्यावर भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून मुदखेड नगरपालिकेतील सत्ताधारी काँग्रेस सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरल्यामुळे मुदखेड नगरपालिका बरखास्त करण्याची मागणी भाजपचे प्रविण गायकवाड यांनी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मुदखेड शहर हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो तसेच मुदखेड नगरपालिकेवर गेल्या दोन दशकापासून काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. मुदखेड शहरांमध्ये विविध योजनांअंतर्गत अनेक ठिकाणी जलकुंभाची उभारणी करण्यात आली. तसेच त्यातील काही जलकुंभ आज भग्न अवस्थेत आहेत. तर काहीचा उपयोग होत नाही. मुदखेड शहरातील या विविध ठिकाणी बांधण्यात आलेल्या जलकुंभाचे हस्तांतरण नगरपालिकेने केले नाही. तसेच मुदखेड शहरात मागील आठवडाभरापासून दुषित पाणी पुरवठा होत असल्याने साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. तसेच मुदखेड शहरातील अनेक ठिकाणी एक दिवस आड करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

अशा पद्धतीने मुदखेड नगरपालिका पाण्यासारख्या संवेदनशील विषयावर असंवेदनशील असलेल्यामुळे व इतर विषयावर मुदखेड नगरपालिका पुर्णपणे अपयशी ठरली असल्याचा आरोप प्रविण गायकवाड यांनी सत्ताधारी काँग्रेसवर केला आहे. त्यामुळे मुदखेड नगरपालिका मुख्यमंत्र्यांनी बरखास्त करण्याच्या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी नगरपालिका, मुदखेड यांच्या मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. सदरील निवेदनावर प्रविण गायकवाड, भाजपचे तालुकाध्यक्ष शंकर मुतकलवाड, शहराध्यक्ष संजय सोनटक्के, युवा मोर्चाचे ज्ञानेश्वर पवार यांच्यासह इतरही भाजपाच कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.AM News Developed by Kalavati Technologies