उस्मानाबाद | सायंकाळी फुले उधळून डिस्चार्ज अन रात्री पुन्हा पॉझिटीव्ह!

कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते.

उस्मानाबाद | रुग्णालय प्रशासनाकडून सायंकाळी फुले उधळून डिस्चार्ज दिलेल्या महिलेचे रिपोर्ट अवघ्या काही तासांत पॉसिटीव्ह आल्याची घटना उस्मानाबाद मधील कळंब मध्ये घडली आहे. मागील अकरा दिवसांपूर्वी कळंब तालुक्यातील तीन जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यात पाथर्डी येथील मुंबई वरून परतलेल्या पती-पत्नीचा समावेश होता. त्यांच्यावर कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते.

गुरुवारी चाचणीसाठी यांचा स्वॅब घेण्यात आला होता याचे अहवाल येणे मात्र बाकी असतानाच, आयसीएमआरच्या (भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद) नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार जी की "रुग्णा कुठलीही चाचणी न करता थेट दहाव्या दिवशी त्याला रुग्णालयातून सुटी द्या अस सांगते". या नियमानुसार गुरुवारी घेतलेल्या चाचणीचा अहवाल येण्याआधीच या दाम्पत्याला रुग्णालय प्रशानाकडून ठणठणीत असल्याचे सांगत. शुक्रवारी सायंकाळी डिस्जार्ज देण्यात आला. मात्र डिस्चार्ज मिळाल्यानंतर अवघ्या काही तासांत त्यातील महिलेच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गोंधळ उडाला. हे नमुने तपासणीसाठी लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठवून देण्यात आले होते. दरम्यान, रुग्णाची प्रकृती सध्या ठीक आहे. मात्र नवा नियम आता नागरिकांच्या जीवावर उठतोय की काय अशी भावना सध्या नागरिक व्यक्त करीत आहेत

नियम काय सांगतो?
कोरोनाबाधित रुग्णाच्या सलग तीन चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतरच त्याला सुटी दिली जात होती. मात्र, आयसीएमआरच्या नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार रुग्णाची कुठलीही चाचणी न करता थेट दहाव्या दिवशी त्याला रुग्णालयातून सुटी दिली जाणार आहे. सुटी देण्यात आलेल्या रुग्णाला आता 14 ऐवजी सात दिवसांसाठी होम क्वारंटीन राहावे लागणार आहे. कोरोनाविषयी केंद्र सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचनेनुसार, कोरोनाच्या संदिग्ध रुग्णाच्या पहिल्या चाचणीनंतर तो पॉझिटिव्ह आल्यास त्यावर दहा दिवस उपचार केले जाणार आहेत. यानंतर त्याची पुन्हा चाचणी केली जाणार नाही. दरम्यान, मध्यम लक्षणे असलेले रुग्ण उपचारानंतर बरे झाल्यावर त्यांना दहाव्या दिवशीच चाचणीशिवाय सुटी दिली जाणार आहे. परंतु सुटी देत असताना रुग्णाला सलग तीन दिवस ताप नसावा किंवा आॅक्सिजनची गरज भासू नये, अशी अट आहे.AM News Developed by Kalavati Technologies