नागपुरातील पहिल्या कोरोना बाधित रुग्णाला डिसचार्ज

तीनही टेस्ट निगेटिव्ह आल्याने या रुग्णाला सुट्टी देण्यात आली

नागपूर | नागपुरातील पहिल्या कोरोना बाधित रुग्णाला उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. या रुग्णाला रुग्णवाहिकेतून घरी सोडण्यात आले. घरी पोहचल्यावर कोरोना मुक्त झाल्याचा आनंद अनुभवायला मिळाला. घरी पोहचल्यावर कुटुंबीयांनी या रुग्णाला ओवाळणी घातल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अमेरिकेतून परत आल्यावर 11 मार्चला या रुग्णाची कोरोना टेस्ट पोजिटिव्ह आली होती. ज्यानंतर त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार घेत असताना या रुग्णाच्या नंतरच्या तीनही टेस्ट निगेटिव्ह आल्याने या रुग्णाला गुरुवारी सुट्टी देण्यात आली.AM News Developed by Kalavati Technologies