दीड रुपयांच्या 'या' गोळीनं कोरोना रुग्ण बरे होतायेत? डॉक्टरांनी केला दावा, सविस्तर जाणून घ्या...

कोरोनावर प्रभावी ठरतेय 'ही' दीड रुपयांची गोळी? डॉक्टरांचा दावा,

नवी दिल्ली | जगभरातील शास्त्रज्ञ कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी लस तयार करण्यात गुंतले आहेत. कोरोना असा एक आजार आहे ज्यापासून लोक स्वतःहून बरेही होत आहेत. कोरोनाला आळा घालण्यासाठी डॉक्टरांनी शक्य तेवढे पर्याय चाचपून पाहण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं आता जुन्या औषधांवर संशोधन देखील केले जात आहे. याच प्रयत्नांदरम्यान केवळ एका दीड रुपयांच्या गोळीकडे आता जगभरातील डॉक्टरांचे लक्ष लागलं आहे. या स्वस्त औषधाचे नाव आहे मेटफॉर्मिन. या गोळीचा वापर मधुमेहाच्या रुग्णांवर केला जातो.

सध्या ही गोळी कोरोनाबाधित रुग्णांसाठी वापरली जातं आहे. या गोळीचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत हे विशेष. एसीएन या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने चीनमधील डॉक्टरांनी या गोळीसंदर्भात सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे वृत्त समोर आलं आहे. डॉक्टरांनी केलेल्या संशोधनात असे आढळून आले की मधुमेह आजार असलेले व्यक्ती ज्यांना कोरोनाची सुद्धा लागण झाली आहे. त्यांना ही गोळी देण्यात आली. त्यावर औषध न घेतलेल्या रुग्णांच्या तुलनेत त्यांचे मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे.

डॉक्टरांनी असा दावा केला आहे की, मधुमेहाची लागण झालेले मात्र मेटफॉर्मिन औषध न घेणारे 22 लोक कोरोनामुळे मरण पावले तर ते औषध घेणारे केवळ तीन रुग्ण मरण पावले. मीडिया रिपोर्टनुसार अमेरिकेच्या मिनेसोटा विद्यापीठानेही सुमारे सहा हजार रूग्णांवर हे औषध वापरुन पाहिले आहे. इथले संशोधक असेही म्हणतात की मेटफॉर्मिनमुळे कोरोना विषाणू-संक्रमित रूग्णांच्या मृत्यूची शक्यता कमी होते.

इंग्रजी वृत्तपत्र द सनच्या माहितीनुसार, ब्रिटनची प्रमुख आरोग्य संस्था नॅशनल हेल्थ सर्व्हिस बर्‍याच काळापासून मेटफॉर्मिन वापरत आहे. हे औषध मधुमेह तसेच स्तन कर्करोग आणि हृदयरोगांमध्ये देखील प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. याचा उपयोग 1950 पासून टाइप 2 मधुमेह (मधुमेह) च्या उपचारांसाठी केला जात आहे.AM News Developed by Kalavati Technologies