धुळे । पाण्यासाठी नगरसेवकाचं शोले स्टाईल आंदोलन, अभियंत्यांनी हमी दिल्यानंतर उतरले खाली

नगरसेवकांना यापुढे पाणीपुरवठा वेळेत करण्याचे आश्वासन दिले

धुळे । पाणीप्रश्ना वरती एमआयएमच्या नगरसेवकांचे शोले स्टाईल आंदोलन अखेर दोन तासानंतर महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने मागे घेण्यात आले. आठ ते नऊ दिवसांनंतर देखील नागरिकांना शहरात पाणीपुरवठा होत नसल्याने पाणी प्रश्न अत्यंत गंभीर बनला होता. वेळोवेळी अधिकाऱ्यांना यासंदर्भात तक्रार करून देखील महानगरपालिकेकडून कुठलीच उपाय योजना केली जात नसल्याने अखेर इस्लामपुरातील एमआयएमच्या दोन नगरसेवकांनी अखेर देवपूर परिसरातील नवरंग पाण्याच्या टाकी वरती चढून, शोले स्टाईल आंदोलन केले. या आंदोलनाची माहिती पालिका प्रशासनास मिळताच पालिका प्रशासनाचे अधिकाऱ्यांनी नवरंग पाण्याची टाकी कडे धाव घेतली व आंदोलन कर्त्या नगरसेवकांना यापुढे पाणीपुरवठा वेळेत करण्याचे आश्वासन दिले. आंदोलन सुरू झाल्यानंतर तब्बल दोन तासानंतर अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर अखेर आंदोलन मागे घेण्यात आले. यापुढे तरी अशा पद्धतीने पाणीप्रश्नावर कुणालाही आंदोलन करण्याची वेळ आणू नये. अशा शब्दात या आंदोलनकर्त्या नगरसेवकांनी पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सुनावले.AM News Developed by Kalavati Technologies