धुळे ब्रेकिंग! शिरपूर तालुक्यात सहा पोलीसांना कोरोनाची लागण

धुळ्यातील शिरपूर तालुक्यात कार्यरत असलेल्या 6 पोलीसांना कोरोनाची लागण झाली आहे

धुळे । धुळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच कोरोनायोध्दा असणाऱ्या पोलीसांना कोरोनाची लागण होण्याचे सत्र सुरूच आहे. आज पुन्हा शिरपूर तालुक्यातील 6 पोलीसांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. कोरोनाच्या काळात पोलीस आपल्या जीवाची काळजी न करता आपले कर्तव्य पार पाडत आहे. अशातच अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यामधुन बहुतांश पोलीस कर्मचारी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या कर्तव्य़ावर रूजू झाले आहे.AM News Developed by Kalavati Technologies