भिमा कोरेगाव दंगलीदरम्यान दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची धनंजय मुंडे यांची मागणी

भिमा कोरेगाव दंगलीनंतर झालेल्या हिंसाचारादरम्यान आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे

मुंबई । महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवतिर्थावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सरकार स्थापन झाल्यानंतर या सरकार समोर अनेक आव्हाने आहेत. राज्यात झालेल्या अनेक आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या आंदोलकांवरील गुन्हे मागे मुख्यमंत्री आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. आरे आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतल्यानंतर काल नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात आले आहेत.

यानंतर आता भिमा कोरेगाव दंगलीनंतर झालेल्या हिंसाचारादरम्यान आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. याआधीच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. धनंजय मुंडे यांनीही ही मागणी लावून धरली असून या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. 

दरम्यान, भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीत अनेक महिला, युवक आणि कार्यकर्ते यांच्यावर गंभीर गुन्हे मागील सरकारने दाखल केले आहेत. शिवाय इंदू मिल आंदोलनातील युवकांवरही गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे मागे घ्यावेत आणि दलित समाजाला न्याय द्यावा, अशी मागणीही आमदार प्रकाश गजभिये यांनी केली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याप्रकरणी गुन्हे लवकरात लवकर मागे घेण्याचे आश्वासन दिले आहे.AM News Developed by Kalavati Technologies