अमृता फडणवीस पुन्हा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर; कारण वाचून व्हाल अवाक्

'फोटो लेते रहो' या वाक्यामुळं अमृता फडणवीस ट्रोल

नागपूर | माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. आरोग्याच्या संदर्भातील एका कार्यशाळेत सहभागी झाल्या असताना टेबलवरील एका कागदावर लिहून ठेवलेल्या एका वाक्यामुळं त्यांना नेटकऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले आहे. नागपूर ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनाकालॉजिकल सोसायटी या स्वयंसेवी संस्थेनं नुकतंच एक आरोग्यविषयक वेबिनार आयोजित केलं होतं. या वेबिनॉरमध्ये अमृता फडणवीस या सुद्धा सहभागी झाल्या होत्या. यापार्श्वभूमीवर त्यांनी डॉक्टरांशी संवाद साधला. त्यासंदर्भातील एक पोस्ट स्वत: अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटरवरून शेअर केली. मात्र जवळच असलेल्या कागदावर लिहून ठेवलेल्या एका वाक्यामुळं त्यांना नेटीझन्संनी मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अमृता फडणवीस चर्चेत होत्या. शिवाय त्यांच्याकडे चांगली गायनकला असल्यानं प्रकाशझोतातही आल्या होत्या. अनेक कार्यक्रमांत त्यांनी गाणी गायली होती. मात्र सुरक्षेचे नियम पायदळी तुडवून क्रूझवर सेल्फी काढल्यानं प्रथमच त्या वादात सापडल्या होत्या. त्यानंतर शिवसेनेनं भाजपशी युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळवून घेतल्यानंतर सुरुवातीच्या काळात अमृता फडणवीस शिवसेनेवर व ठाकरे कुटुंबीयांवर वारंवार टीका करत होत्या. त्यातूनही अनेक वाद निर्माण झाले होते. अमृता फडणवीस यांना प्रसिद्धीची सवय लागल्याची टीका होऊ लागली होती. ताज्या ट्विटनंतर पुन्हा एकदा त्या ट्रोल झाल्या आहेत.AM News Developed by Kalavati Technologies