फडणवीसांनी स्वतः कोर्टात हजर राहावे, वकील सतीश उकेंची मागणी, 3 वाजता होणार सुनावणी

2014 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी गुन्ह्य़ांची माहिती लपवल्याप्रकरणी समन्स बजावण्यात आला होता.

नागपूर | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 च्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात 2 गुन्ह्याची माहिती लपवली असल्याचे आरोप लावण्यात आली होती. या प्रकरणी आज नागपूर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वयक्तिकरित्या न्यायालयात हजर राहण्यापासून सूट देण्यात यावी अशी फडणवीस यांच्या वकिलांकडून कोर्टात मागणी करण्यात आली आहे. मुंबईतील काही अनपेक्षित घडामोडींमुळे फडणवीस कोर्टात हजर राहू शकत नसल्याचा युक्तिवाद माजी देवेंद्र फडणवीस यांच्या वकिलाने केला आहे. परंतु देवेंद्र फडणवीसांनी स्वतः हजर राहावे अशी प्रतिवादी वकील सतीश उके यांनी कोर्टात मागणी केली. फडणवीसांनी स्वतः व्यक्तिगत हजर राहावे की नाही याबाबत दुपारी 3 वाजता नाययलय निर्णय देणार.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्थानिक न्यायलयाकडून 2014 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी गुन्ह्य़ांची माहिती लपवल्याप्रकरणी समन्स बजावण्यात आला होता. नागपूर पोलिसांनी फडणवीस यांच्या निवासस्थानी हे समन्स पाठवले होते. वकील उके यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातील बदनामी आणि फसवणूक असे दोन्ही गुन्हे नागपूरमधील आहेत. 2014 ची विधानसभा निवडणूक लढवताना फडणवीस यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात या दोन्ही गुन्ह्य़ांची माहिती लपवण्यात आली. फडणवीस यांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती.AM News Developed by Kalavati Technologies