पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार; लाच घेतल्याप्रकरणी जेरबंद..

अहमदपूर येथील नायब तहसीलदार, सुनील कांबळे यांना 50 हजार रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत विभागाकडून अटक

अहमदपूर । अहमदपूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात कार्यरत असलेले नायब तहसीलदार सुनील कांबळे(वय 49वर्ष) यांना 50 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने, रंगेहात पकडून त्यांना जेरबंद केल्यामुळे तालुक्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे. हाडोळती येथील स्वस्त धान्य दुकाने रद्द झाल्यामुळे कार्डधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून या दुकानाची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार सुनील कांबळे यांनी, महिला दुकानदारांकडून पन्नास हजाराची मागणी केली होती.

याबाबत महिला दुकानदाराने लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आपली तक्रार दाखल केली होती. या विभागाचे पोलीस उपअधिक्षक माणिक बेद्रे यांच्या पथकाने सापळा रचून सदरची रक्कम स्वीकारताना कार्यालयातच रंगेहात पकडून जेरबंद केले आहे. अहमदपूर येथील पोलीस ठाण्यात कलम 7 लाचलुचपत प्रतिबंधक कायदा अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केल्यामुळे तालुक्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे.AM News Developed by Kalavati Technologies