इंदापूर प्रशासकीय भवनासमोर; कडाडल्या वंचित बहुजन आघाडीच्या 'हलग्या'

वंचित बहुजन आघाडीचे इंदापूरात लॉकडाऊन रद्द करण्यासाठी हलकी आंदोलन

इंदापूर । केंद्र व राज्य सरकार लॉकडाऊन उठवायला तयार नसून ते काहीही सवलत द्यायला तयार नाहीत, याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभर डफली आंदोलन करण्यात आहे. इंदापूर मध्येही वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रशासकीय भवनासमोर हलगी वाजवून आंदोलन केले. "ये सरकार झुटी है, देश कि जनता भुकी है", "एस टी सेवा सुरु झालीच पाहिजे, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो", लॉकडाऊन रद्द झाला पाहिजे अशी विविध प्रकारची घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली.

राज्यात एसटी सेवा बंद असल्याने कामगारांची उपासमार होत आहे, तर दुसरीकडे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापही बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. या बससेवा तात्काळ सुरू कराव्यात या प्रमुख मागणीला घेऊन राज्यातील एसटी डेपो व शहरातील सार्वजनिक बस डेपो समोर दिवसभर डफडे वाजविण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. त्याच अनुषंगाने इंदापूर प्रशासकीय भवनासमोर कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन छेडले.AM News Developed by Kalavati Technologies