मीरा-भाईंदरमध्ये वंचित बहुजन आघाडीचे 'डफली' बजाओ आंदोलन..

वंचित बहूजन आघाडीचे नेते, अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी राज्यसरकारच्या विरोधात डफली बजाओ आंदोलनाची हाक दिली

मीरा भाईंदर । राज्यसरकारने एसटी महामंडळ सेवा, सार्वजनिक वाहतूक सुरू करा या मागणीसाठी संपूर्ण राज्यात आज वंचित बहुजन आघाडीतर्फे डफली बजाव आंदोलन करण्यात येत आहे. याचेच पडसात आज भाईंदरमध्ये पाहायला मिळले. भाईंदर पश्चिमच्या एसटी डेपो बाहेर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी डफली बजाओ आंदोलन केले. यावेळी महेंद्र कांबळे, उमेश शिंदे, महेंद्र चाफे, महिला अध्यक्ष अश्विनी कांबळे, उत्तम भगत, सलीम खान, अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. वंचित बहूजन आघाडीचे नेते अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी राज्यसरकारच्या विरोधात डफली बजाओ आंदोलनाची हाक दिली. स्वतः अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी नागपूरमधून आंदोलनाची सुरुवात केली आहे.

महाराष्ट्रात टाळेबंदीमध्ये शिथिलता आल्यानंतर छोटे-मोठे लघुउद्योग, हातावर पोट असणाऱ्यांचे दुकाने, तसेच एसटी महामंडळ सेवा, प्रत्येक शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू करण्यात यावी. या प्रमुख मागणीसाठी राज्यभर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एसटी डेपो बाहेर डफली वाजवून आंदोलन करण्यात येत आहे. भाईंदर पश्चिमच्या एसटी डेपो बाहेर डफली वाजवून राज्यसरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली.AM News Developed by Kalavati Technologies