दिल्लीतील हिंसाचार सुरूच, हिंसा करणाऱ्यांना दिसता क्षणीच गोळ्या घालणार

हिंसाचारात आतापर्यंत 13 जणांचा बळी गेला आहे

नवी दिल्ली | सीएएवरून दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणत हिंसाचार सुरू आहे. काही दिवस दिल्लीतील वातावरण निवळले होते. मात्र सलग तीन दिवसांपासून हिंसा उसळली आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 13 जणांचा बळी गेला आहे. तर जवळपास 150 जण जखमी झाले आहेत. दिल्ली पोलिसांकडून ही माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागात दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत.

दिल्ली हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये लष्कराचा पाचरण करण्याची मागणी करण्यात आली. मात्र गृहमंत्रालयाने याला नकार दिला आहे. केंद्रीय सुरक्षा दल आणि पोलीस योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळत आहेत, असं सांगण्यात आलं आहे. तर अमित शहा यांनी दिल्लीकर जनतेला शांततेचं आवाहन केलंय. आफवांवर विश्वास ठेवू नका, असं म्हटलंय.AM News Developed by Kalavati Technologies