दिल्ली हिंसाचार, चिथावणीखोर भाषण करणाऱ्या भाजप नेत्यांवर गुन्हे नोंदवण्याचे आदेश देणाऱ्या न्यायाधीशांची बदली

दिल्ली हिंसाचारा प्रकरणी सुनावणी करताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले तसेच चिथावणीखोर भाषण करणाऱ्या भाजप नेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश देखील पोलिसांना दिले होते.

दिल्ली । दिल्ली उच्च न्यायालायचे वरिष्ठ न्यायाधीश एस मुरलीधर यांची पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे. एस मुरलीधर यांनी 26 फेब्रुवारी ला दिल्ली हिंसाचारा प्रकरणी सुनावणी करताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले तसेच चिथावणीखोर भाषण करणाऱ्या भाजप नेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश देखिल पोलिसांना दिले होते. ते म्हणाले की, 'पोलिसांच्या कार्यप्रणालीमुळे मी संभ्रम निर्माण करणारी आहे. शहरात मोठ्याप्रमाणात हिंसा झाली आहे. 1984 च्या शीख विरोधी दंगलीचे साक्षीदार आम्हाला व्हायचं नाहीये.'

ज्या दिवशी त्यांनी हे विधान केलं त्याच दिवशी त्यांची बदली पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयात करण्यात आली. यावर विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सर्वोच्च न्यायालायाच्या संबंधीत विभागाने सांगितले की, न्या. मुरलीधर यांनी बदलीची विनंती 12 फेब्रुवारीलाच केली होती. जी काल मंजूर करण्यात आली.

न्या. मुरलीधर यांच्या बदली संदर्भात कायदे व न्यायमंत्र्यालाने दिलेल्या अधिसुचनेमध्ये सांगण्यात आले आहेकी, 'भारतीय संविधानाच्या कलम 222 च्या खंड 1 नूसार असणाऱ्या अधिकारांचा वापर करून राष्ट्रपती व सरन्यायाधीशांशी चर्चा केल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. मुरलीधर यांची बदली करण्यात आली असून पंजाब व हरयाणा उच्च न्यायलयाच्या कार्यभार स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.'

या निर्णयाचा दिल्ली उच्च न्यायालयातील बार असोसिएशनने न्या. मुरलीधर यांच्या बदलीवर फेरविचार करण्याची विनंती सरन्यायाधीशांना केली आहे. 'अशा प्रकारच्या तातडीच्या बदल्यांमुळे सामान्यांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास ढळू शकतो.' असे बार असोसिएशनने म्हटले आहे.

कोण आहेत न्या. मुरलीधर

  • जातीय दंगली आणि वैयक्तिक स्वातंत्र्यावर कठोर भाष करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या न्या. मुरलीधर यांनी हाशिमपूरा हिंसाचाराबद्दल निर्णय दिला होता. उत्तर प्रदेशातील 1987 च्या सामुहीक हत्यांसाठी प्रादेशिक सशक्त बलाच्या कर्मचाऱ्यांना दोषी ठरवले होते.
  • 1984 च्या शीख विरोधी दंगलीसाठी कॉंग्रेस नेते सज्जन कुमार दोषी असल्याचा निर्णय न्या. मुरलीधरन यांनी दिला होता.
  • भारतात समलिंगतेवर निर्णय देणाऱ्या तात्कालीन मुख्यन्याधीश एपी शहांच्या दोन न्यायाधीशीय पीठामध्ये न्या. पीठाचे ते सदस्य होते.


AM News Developed by Kalavati Technologies