दिल्ली विधानसभा निवडणूक, आपच्या 46 उमेदवारांची पहिली यादी जाहिर

अरविंद केजरीवाल नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत

नवी दिल्ली । दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या घरी आम आदमी पक्षाची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीनंतर आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात 46 आमदारांना तिकिट देण्यात आले आहे. या निवडणुकीत अरविंद केजरीवाल नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया पाटपरगंजमधून निवडणूक लढवणार आहेत.

दिल्लीत एकूण 70 विधानसभा जागा आहेत. त्यापैकी 58 सर्वसाधारण गटात आहेत तर 12 जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत. 2015 च्या निवडणुकीत 70 विधानसभा जागांपैकी 67 जागांवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने (आप) बाजी मारली होती, तर उर्वरित तीन जागा भाजपाने जिंकल्या. दिल्लीत कॉंग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाचे खाते उघडता आले नाही.AM News Developed by Kalavati Technologies